गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टच्कन ओले गाडी सुटली, पडले चेहेरे, क्षण साधाया ह्सरे झाले गाडी सुटली, हाता मधुनी  हात कापरा तरी सुटे ना अंतरातली ओली माया तुटुदे म्हटले तरी तुटे ना का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते डोळ्यानदेखत सरकत जाते आठवाणींचा ठिपका होते गाडी गेली, फलाटावरील नि:श्वासांचा कचरा झाला गाडी गेली, डोळ्या मधल्या निर्धाराचा पारा फुटला

Written by Sandeep Khare, this is a poem that I love. I do not own the copyright to this, I am sharing this here for people who would like to read it. I’m working on a translation, will put it up soon.